Posts

Showing posts from March, 2018

भाषिक खेळ

भाषिक खेळ 1) . समान अर्थ व जोडशब्दांची ओळख . हा खेळ कितीही मुलांमध्ये खेळता येईल. खाली काही शब्दांच्या जोडया दिलेल्या आहेत यातील प्रत्येक शब्दाचा असा समान अर्थ शोधा की त्या जोडीपासून नवीनच एक जोडशब्द तयार होईल . उदा.-झोपडी+दरवाजा बरोबर घरदार होते. झोपडी म्हणजे घर व दरवाजा म्हणजे दार. 1.फायदा+नुकसान 2.वडील+मुलगा 3.विवाह+काम 4.दिनांक+दिवस 5.शरीर+शिक्षा 7.राहणे+घर याप्रकारे शब्दांच्या जोडया देऊन खेळ घेता येतो. उत्तरे-1.नफातोटा 2.बापलोक 3.लग्नकार्य 4.तारीखवार 5.देहदंड 6.वसतिगृह. 2) . खाली विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देणे, सगळी उत्तरे एका शब्दात आणि मराठीमध्ये असावीत …. पण त्या शब्दांमध्ये काना, मात्रा, उकार, वेलांटी असू नये..  अवधि – 1तास उदाहरणार्थ : मुलाचे नाव – मदन १) गावाच नाव २) मुलीचं नाव ३) आडनाव ४) धातू ५) रंग ६) गोड पदार्थ ७) वस्तू ८) पूजा साहित्य ९) दागिना १०) हत्यार ११) पक्षी १२) प्राणी